आरुणि विद्यामंदिर ची स्थापना इ.स.सन १९७३ मध्ये जून महिन्यात झाली. सध्या आभा गट प्रभागट व विभा गट अशा स्वरूपात विस्तारलेल्या आरुणि विद्यामंदिर सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. हवेशीर जागेत लहान मुलांचा विचार करून बनवलेली "बाग" अरुणि विद्यामंदिर चा नावलौकिक वाढवत आहे. तसेच मुलांच्या शारीरिक विकासामध्ये वाढ होण्यासाठी शाळेमध्ये प्रशस्त क्रीडांगण आहे.
पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेमध्ये "पुस्तक घर "सुरू केले आहे. दरवर्षी संपन्न होणारा बाहुला- बाहुली विवाह सोहळा व उत्सव नात्यांचा मुलांचा आकर्षण बिंदू ठरत आहे. या उपक्रमामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत होतो. शिक्षक विद्यार्थी व पालक यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. तसेच शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात. सातारा भारत "स्काऊट आणि गाईड" जिल्हा कार्यालय सातारा यांच्यावतीने बनी-कब- बुलबुल या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या उपक्रमात शाळेतील विभा गटातील विद्यार्थी कृतीयुक्त गोष्ट आणि नृत्य स्पर्धेत नेहमीच यश संपादन करीत असतात.याशिवाय शाळेमध्ये वसंत पंचमी दहीहंडी,गुरुपौर्णिमा, नागपंचमी, बालनगरी, भाजी मंडई ,स्नेहसंमेलन यासारखे विविध उपक्रम आयोजित केले जातात. विशेष मुलांची पूर्वतयारी अनुभवातून, खेळातून, शिक्षण दिले जाते. मराठी, संस्कृत, इंग्रजीची पूर्व तयारी हसत -खेळत मुलांकडून करून घेतली जाते.