नवागतांचे स्वागत

पंचमहाभूत उपक्रम

आरुणि विद्यामंदिर, वाई    06-Jul-2026
Total Views |
नवागतांचे स्वागत
पंचमहाभूत उपक्रम*
सोमवार
दि १५ /६ / २०२६ रोजी शाळेमध्ये नवागत विद्यार्थी व पालकांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास शाला समितीचे सदस्य, मा सौ . सुधा जाधव मॅडम , मा सौ घैसास मॅडम , मा सौ . काणे मॅडम ,आजन्म सेविका राव मॅडम उपस्थित होते
तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी "पंचमहाभूत" या संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत ओळख करून देण्यात आली. प्रत्येक महाभूताशी संबंधित कृती, खेळ, गीते व अनुभवात्मक उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध कृती पूर्ण केल्या.
मुलांना हालचालींचे खेळ , निरीक्षण व संवाद यांद्वारे पंचमहाभूतांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्सुकता व आत्मविश्वास निर्माण झाला
कार्यक्रम आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला व नवागत विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सकारात्मक सुरुवात झाली
 
नवागतांचे स्वागत व पंचमहाभूत उपक्रम
नवागतांचे स्वागत व पंचमहाभूत उपक्रम
नवागतांचे स्वागत व पंचमहाभूत उपक्रम
नवागतांचे स्वागत व पंचमहाभूत उपक्रम