आरुणि विद्यामंदिर वाई येथे
जन्मदिन संस्कार कार्यक्रम साजरा
मंगळवार दि.३० जून २०२६ रोजी
आज शाळेमध्ये जून महिन्या मध्ये ज्यांचे वाढदिवस आहे . त्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचा जन्मदिन संस्कार कार्यक्रम भारतीय संस्कृतीनुसार उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास शाला समिती सदस्या मा. सौ. घैसास ताई , विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षकवृंद तसेच शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्लोक घेण्यांत आला . त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तम चारित्र्य, नियमित अभ्यास, आई-वडिलांचा व गुरुजनांचा आदर तसेच राष्ट्रसेवेचा संकल्प केला. यज्ञामध्ये विद्यार्थी व पालकांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात आहुती देण्यात आली. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस नसून मुलांमध्ये भारतीय संस्कृती, कृतज्ञता, शिस्त, सदाचार आणि संस्कार रुजविण्याचा एक प्रभावी उपक्रम असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रम आनंददायी, संस्कारमय आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.